| श्रीरंग सावळा
तू मी गौरकाय
राधा ही प्रीत दोन जीवांची अद्वैत रे मुकुंदा ये राधिके अशी ये होऊनि प्रीति मुग्धा नयनातुनी फुलू दे अपुल्या अमोल छंदा ये प्रेमले अशी ये फुलवित सुप्रभाती प्रणायातल्या सुरांनी सजवित चांदराती मिटल्या फुलापरी त्या तव नील लोचनात लावून भारलेली भावूक प्रीत ज्योत का लोचनी प्रिया रे हृदयी तुझेच रूप दिनरात लावितो मी येथे तुझाच दीप गाते तुझेच गाणे स्वप्नी तुझे उखाणे तुझियाकडेच धावे मनपाखरू दिवाणे येताच मी परंतु तुझिया समीप का गे होशी अबोल वेडी विणीशी मनात धागे त्या चित्त पाखराला लपवून ठेविसी का भारावूनी अशी या नेत्रात पाहसी का तो बोलके अबोल क्षण सर्व आठवावे मम लाजऱ्या दिठीत सारेच साठवावे हा छंद या जीवाला जडवी तुझीच मूर्ती मी मंगलातुनी या गुंफी अभंग नाती |
||||
| गीत | - | शांताराम नांदगावकर | ||
| संगीत | - | अनिल मोहिले | ||
| स्वर | - | कृष्णा कल्ले, अरुण दाते | ||
| राग | - | दरबारी (नादवेध) | ||
|
||||