तुज पाहिले असे अन्‌ नशिबात ये गुलामी

घायाळ काळजाला काही मुळी सुचेना
तुजवाचुनी जिवाला काहीच अन्‌ रुचेना
या भाळल्या जिवाची पहिली अशी सलामी

नजरेत धुंद होत्या हुकुमी तुझ्या कट्यारी
घालून घाव गेल्या माझ्या असे जिव्हारी
आव्हान झेलले मी, पण जाहलो निकामी

डोळ्यात घेउनी तू आलीस धुंद रात्री
लावून चांदण्याची गेलीस आग गात्री
स्वप्नास रंग आले हे लाल अन्‌ बदामी
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत -
स्वर - अरुण दाते
 
www.aathavanitli-gani.com