| असा बेभान हा
वारा, कुठे
ही नाव मी नेऊ
? नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ ? जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती जिवाचे पूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ? कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे बुडले गाव ते आता, बुडले नावही मागे दिले, हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ ? जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले तुझे सौभाग्य ल्याया, हे तुझी होऊन मी आले तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ? |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
|
||||