| जपून चाल्
पोरी जपून चाल् बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल् ! लाडाने वळून बघायची खोड् नाजूक नखऱ्याला नाही या तोड् डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल् ! केसात सुरंगी रंगात ग विजेची लवलव अंगात ग खट्याळ पदराला आवर घाल् ! जिंकीत जिंकीत जातेस तू ज्वानीचं गाणं हे गातेस तू हासून होतेस लाजून लाल् ! उरात लागलेत नाचाया मोर् कोणाच्या गळ्याला लागेल दोर् ? माझ्या या काळजाचा चुकेल ताल् ! |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | अरुण दाते | ||
|
||||