| भातुकलीच्या
खेळामधली राजा
आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी राजा वदला, "मला समजली, शब्दावाचुन भाषा माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा" का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी ? राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा "उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा" पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी तिला विचारी राजा, "का हे जीव असे जोडावे ? का दैवाने फुलण्याआधी, फूल असे तोडावे ?" या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ? का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ? वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | यशवंत देव | ||
| स्वर | - | अरुण दाते | ||
| राग | - | वृंदावनी सारंग (नादवेध) | ||
|
||||