| धुके दाटलेले
उदास उदास मला वेढिती हे तुझे सर्व भास उभी मूक झाडे, विरागी किनारा झुरे अंतरी अन् फिरे आर्त वारा कुणीही न येथे दिसे आसपास कुठे चालल्या या दिशाहीन वाटा ? कुणा शोधिती या उदासीन लाटा ? दिशांतून दाटे तुझा एक ध्यास क्षणी भास होतो तुझे सूर येती जिवा भारुनी हे असे दूर नेती स्मृती सोबतीला असा हा प्रवास |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | यशवंत देव | ||
| स्वर | - | अरुण दाते | ||
|
||||