राधा रमणी मोहन हरिणी,
चाले चपल चरणी
ठुमकत आल्या किती गौळणी

आले नेसून काळी चंद्रकळा
सोळा शिणगार आले घालून गळा
घडा लाजंचा डोईवर डुचमळला
अन्‌ भिजली तनू देखणी

आली चंद्रावळ मी नखऱ्याची
लाल पैठण जरीच्या पदराची
जशी रंभा अप्सरा इंद्राची
उभी धरणीच्या अंगणी

नको कान्हा अशी ही बळजोरी
मथुरेच्या जाऊ दे बाजारी
दिसं बुडताना येईल माघारी
तुज पुरवीन मी मागणी
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले
चित्रपट - मंत्र्याची सून (१९८०)
 
www.aathavanitli-gani.com