| आज गोकुळात
रंग खेळतो हरी; राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी ! तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढुनी खुशाल रंग टाकतो रंगवून रंगुनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी ! सांग श्यामसुंदरास काय जाहले ? रंग टाकल्याविना कुणा न सोडिले: ज्यास त्यास रंग रंग रंग लागले ! एकटीच वाचशील काय तू तरी ! त्या तिथे अनंगरास रंगला; गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला; तो पहा मृदुंग मंजिऱ्यात वाजला हाय ! वाजली फिरून तीच बासरी ! |
||||
| गीत | - | सुरेश भट | ||
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
|
||||