चंद्राविना झुरावी जशी पौर्णिमा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !

झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी
विजनी वसंत येता आल्हाद कोकिळेसी
मधुमालती जशी गंधाविना निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !

दुरुनि खुणावते ती कलिका कुणास सांगा
भ्रमरांचिया थव्यांनी फुलतात रम्य बागा
स्वाति जलाविना रे शिंपा जसा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !
 
 
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - पुष्पा पागधरे, सुधीर फडके
चित्रपट - चोरावर मोर (१९५८)
 
www.aathavanitli-gani.com