| किती पांडुरंगा
वाहू संसाराचा
भार ? लक्ष चौऱ्याऐंशींचा नको आता येरझार लोखंडाचे गुणदोष बघे का परिस लेकराची कासावीस माहीत आईस ! पाण्यामाजी तूच देवा, तारीले पाषाण ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन ! कठीण तो मायापाश सुटेना कोणास कपाळीचा टळेनाही कोणा वनवास ! अनाथांचा नाथ तुला बोलतात संत काकुळती आलो आता नको बघु अंत कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया ? पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया ! |
||||
| गीत | - | प्र. के. अत्रे | ||
| संगीत | - | वसंत देसाई | ||
| स्वर | - | ज्योत्सना मोहिले | ||
| नाटक | - | प्रीतिसंगम (१९७१) | ||
|
||||