अंगणी पारिजात फुलला ।
बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला
गमले मजला मुकुंद हसला
सहवासातुन मदिय मनाचा कणकण मोहरला !
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - छोटा गंधर्व
स्वर - जयमाला शिलेदार
नाटक - सुवर्णतुला (१९६०)
राग - बिहाग (संगीत यात्रा)
 
www.aathavanitli-gani.com