काय मला भूल पडलि, भान हरपलें ।
तें मुख वर केलें परि नाहिं चुंबिले ॥

सुंदरिनें अंगुलिनीं ओंठ झांकिले ।
नको नको ऐसें म्हणत तोंड फिरविलें ।
प्रेमभरें तिनें अर्ध नेत्र मिटियले ।
ऐशा त्या ऐन रंगि व्यंग जाहलें ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत शाकुंतल (१८८०)
राग - आनंद भैरवी (मूळ संहिता)
ताल - दादरा
चाल - ’नको नको स्त्रीसंग नाम ग्रहण’
 
www.aathavanitli-gani.com