| जन पळभर म्हणतिल
‘हाय हाय’ ! मी जाता राहिल कार्य काय ? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, तारे अपुला क्रम आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल, होईल काहि का अंतराय ? मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल, कुणा काळजी की न उमटतिल, पुन्हा तटावर हेच पाय ? सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा आपुल्या कामि लागतिल, उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय ? रामकृष्णही आले, गेले ! त्याविण जग का ओसचि पडले ? कुणी सदोदित सूतक धरिले ? मग काय अटकले मजशिवाय ? अशा जगास्तव काय कुढावे ! मोहि कुणाच्या का गुंतावे ? हरिदूता का विन्मुख व्हावे ? का जिरवु नये शांतीत काय ? |
||||
| गीत | - | भा. रा. तांबे | ||
| संगीत | - | वसंत प्रभू | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
| राग | - | मल्हार (नादवेध) | ||
|
||||