| मान वेळावुनी
धुंद बोलू नको चालताना अशी वीज तोलू नको ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा दृष्ट लागेल ग दृष्ट लागेल ग आज वारा बने रेशमाचा झुला ही खुशीची हवा साद घाली तुला मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे रूप पाहून हे चंद्र भागेल ग पाहणे हे तुझे चांदण्याची सुरी हाय मी झेलली आज माझ्या उरी लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे ? ही दिशा कोणती ? कोण सांगेल ग ? |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | यशवंत देव | ||
| स्वर | - | अरुण दाते | ||
|
||||