| तू नजरेने ’हो’
म्हटले, पण
वाचेने वदणार
कधी ? कर पडलेत गळ्यांत तुझे, पण वरमाला पडणार कधी ? तुझे हासरे नयन आठवित, दुःखाची विसरते घडी त्या हृदयाचा या हृदयाशी संगम ग, होणार कधी ? तू नसताना तुझी आठवण, मना जाळिते पदोपदी एक विचारू तुला ? काय ? होणार कधी ग सप्तपदी ? |
||||
| गीत | - | यशवंत देव | ||
| संगीत | - | यशवंत देव | ||
| स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके | ||
| चित्रपट | - | झाले गेले विसरून जा (१९५७) | ||
|
||||