तू विसरुनि जा रे विसरुनि जा
तुझ्या जीवनी चुकुनी आले, चुकले होते वाट

यौवनाची आली चाहुल, तिथे थबकले प्रीतीपाउल
परिचय झाला आणिक अवचित केली जिवाला साथ

दिनराती ज्या स्वप्नी रमले, प्रीत-स्वप्न ते पुरे भंगले
दृष्ट लागली सांग कुणाची, फसला सारा घाट

इच्छा एकच उरी धरी मी, तुला वरावे पुढल्या जन्मी
या जन्मी तरी असाच साहिन दैवाचा उत्पात
 
 
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले
 
www.aathavanitli-gani.com