| तुझे रूप राणी,
कुणासारखे ग
? तुझे रूप राणी, तुझ्यासारखे ग ! तुझा रेशमी केशसंभार काळा जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा बटा दोन भाळावरी की जिभा त्या तिच्या मस्तिला कोण रोधू शके ? तुझे दोन डोळे शराबी शराबी हसे लाज गाली गुलाबी गुलाबी असे रूपलावण्य मी प्रशितो हे मला लाभले ते तुला पारखे ! उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे नजर फेकीता रिते बाण-भाते विधाता करी काय हेवा तुझा गे न्याहळून पाही तुला कौतुके ! |
||||
| गीत | - | जगदीश खेबुडकर | ||
| संगीत | - | दत्ता डावजेकर | ||
| स्वर | - | महेंद्र कपूर | ||
| चित्रपट | - | शेवटचा मालुसरा (१९६६) | ||
|
||||