राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता

पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी तुझीच धुंद राहते
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता

दिवस रात्र ओढ ही या मनास लागते
तुझीच जाहल्या परी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी
नाद चित्र रेखीतो तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सुवासिनी (१९६१)
 
www.aathavanitli-gani.com