रंग माझा तुला ! गंध माझा तुला !
बोल काहीतरी ! बोल माझ्या फुला !

सांग लाजूनही नाव आतातरी;
एक खोळंबले गीत माझ्या उरी;
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला !

वेळ जादूभरी .... ही गुलाबी हवा !
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा !
भास झाला खरा ! श्वास झाला खुला !

हाय, माझी तुझी भेट झाली अशी :
शीळ यावी पुढे चांदण्याची जशी.
सांग, सोडू कसा हात हातातला !
 
 
गीत - सुरेश भट
संगीत - यशवंत देव
स्वर - अरुण दाते
 
www.aathavanitli-gani.com