| रंगुनी रंगात
साऱ्या रंग
माझा वेगळा
! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा ! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ! सांगती ’तातपर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा : "चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !" माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी : माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! |
||||
| गीत | - | सुरेश भट | ||
| संगीत | - | यशवंत देव | ||
| स्वर | - | अरुण दाते | ||
|
||||