| अजुनी रुसून
आहे, खुलता
कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगताच, रडताहि तू हसावे ते आज का नसावे, समजावणी पटे ना धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ? चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना ! की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! |
||||
| गीत | - | आ. रा. देशपांडे ’अनिल’ | ||
| संगीत | - | कुमार गंधर्व | ||
| स्वर | - | कुमार गंधर्व | ||
|
||||