| पूर्वेच्या
देवा, तुझे
सूर्यदेव नाव प्रभातीस येशी सारा जागवीत गाव विधाता जगाचा तूची उधळीत आशा उजळिशी येता येता सभोवती जग, दिशा रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव अंधारास प्रभा तुझी मिळे प्रभाकर दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस तूच चालुनिया येशी माझिया घरास भक्ताठायी गुंतला रे तुझा भक्तिभाव |
||||
| गीत | - | गंगाधर महांबरे | ||
| संगीत | - | विणा चिटको | ||
| स्वर | - | रामदास कामत | ||
| राग | - | भूप (नादवेध) | ||
|
||||