रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तिच्या सागर लहरी नादविती डंका

सुवर्ण कमलापरी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका

लक्ष्मी-लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - पं. भीमसेन जोशी
चित्रपट - स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
राग - हिंडोल (संगीत-सरिता)
 
www.aathavanitli-gani.com