| हसले मनी चांदणे जपुनि टाक पाउल साजणी, नादतील पैंजणे बोचतील ग, फुलं जाइची तुझी कोमला काय चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय ? पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको ग रुसू लाजलाजऱ्या कळ्याफुलांना खुद्कन् आलं हसू हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी, उमटु द्या वाणी का आढेवेढे उगाच, सांगा, काय लाभले राणी ? का ग अशा पाठीस लागता मिळुनी साऱ्या जणी ? आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी किति, किति ग भाग्याची भलतीच ओढ ही कामसुंदराची नव्हे ग श्यामसुंदराची |
||||
| गीत | - | राजा बढे | ||
| संगीत | - | पु. ल. देशपांडे | ||
| स्वर | - | माणिक वर्मा | ||
| राग | - | चंद्रकंस (नादवेध) | ||
|
||||