त्या सावळ्या तनूचे
मज लागले पिसे ग
न कळे मनास आता
त्या आवरू कसे ग !

ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
चोहीकडे बघे मी
परि ना कुठे दिसे ग !

हलतो तरू-लतांत
हा खोडसाळ वात
आलाच वाटतो ’तो’
मी सारखी फसे ग !

खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
डोळ्यास तो दिसावा
हृदयात जो वसे ग !
 
 
गीत - आत्माराम सावंत
संगीत - दशरथ पुजारी
स्वर - माणिक वर्मा
राग - जोग (संगीत यात्रा)
 
www.aathavanitli-gani.com