रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते
सावळे ते रूप नाथा, लोचनी मी पाहते !

श्यामकांती पाहता ती, आसवे ती दाटती
उर्मिलेच्या भावऊर्मी, अंतरी हेलावती
अंतरीची आर्तता ती, आज गीत छेडिते !

आपुल्या हो संगती ते, राम आणि जानकी
प्रीतीने विरही परंतु, एकटी मई मंचकी
आसवांची मालिका मी, श्यामकंठी घालते !

आपुल्या मी दर्शनाला, आज झाले पारखी
भेट होता आपुली ती, जन्म होई सार्थकी
एक आशा मीलनाची, लोचनी जागते !
 
 
गीत - मधुकर जोशी
संगीत - दशरथ पुजारी
स्वर - माणिक वर्मा
राग - भैरवी (नादवेध)
 
www.aathavanitli-gani.com