हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला
तुझ्या कप्पालीला टिला, ग फॅशन मराठी शोभेल तुला

आरं जा जा तू मुला, का सत्तावितय मला
का सत्तावितय मला, न जाऊन सांगेन मी बापाला

धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला, पाणी भरायला, ठेवीन घरकामाला

तुझी फॅशन अशी रे कशी, लांब कल्ले तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा, चल जा हो बाजूला

तुझा पदर वाऱ्याशी उडतो, अगं बघून जीव धडधडतो
तुझी नखऱ्याची चाल, करी जीवाचे हाल, माझे गुल्लाबाचे फुला
 
 
गीत - दादा कोंडके
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी
चित्रपट - आंधळा मारतो डोळा (१९७३)
 
www.aathavanitli-gani.com