| गे मायभू तुझे
मी फेडीन पांग
सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा; शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ? जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला ! मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाटरेषा बनते प्रयागकाशी ! आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी ! |
||||
| गीत | - | सुरेश भट | ||
| संगीत | - | |||
| स्वर | - | |||
|
||||