| चला निघू या
सरसावोनी देशाच्या
उद्धरणी ! विस्कटलेले अवघे जीवन, खंत जयांना याची पडती स्वप्ने उत्थानाची, उज्ज्वल भवितव्याची जागरुक अभिमानी असले, असती जे जे कोणी ! उधाणलेल्या जलधीसंगे यावा झंझावात तशी देउनी पराक्रमाला अभिमानाची साथ परक्यांची या टाकू पुसुनी येथिल नावनिशाणी ! तिखंडात दुमदुमुनी जावी जरि राष्ट्राची कीर्ती कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती भेद विरावे, स्फुरण चढावे, नवशुभ आकांक्षांनी ! ईर्ष्या अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी ’कसे व्हायचे’ अशी नसावी खचलेली जनवाणी हासत जावे काट्यांवरुनी तरुणांनी अनवाणी ! उठता आपण नमतिल विघ्ने महाभयंकर आता काय न केला आपण मर्दन तुंग हिमालय माथा ? विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी !! |
||||
| गीत | - | नाना पालकर | ||
| संगीत | - | |||
| स्वर | - | |||
|
||||