| दिव्यत्वाची
जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती गाळुनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती जलदांपरी येउनिया जाती जग ज्यांची न करी गणती यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परी जयांच्या दहनभूमिवर नाहि चिरा नाही पणती जिथे विपत्ती जाळी, उजळी निसर्ग-लीला निळी काजळी कथुनि कायसे काळिज निखळी एकाची सगळी वसती मध्यरात्रि नभघुमटाखाली शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती |
||||
| गीत | - | बा. भ. बोरकर | ||
| संगीत | - | वसंत प्रभू | ||
| स्वर | - | आशा भोसले | ||
| चित्रपट | - | पुत्र व्हवा ऐसा (१९६१) | ||
|
||||