| माणुसकीच्या
शत्रुऊसंगे
युद्ध आमुचे
सरू जिंकू किंवा मरू लढतिल सैनिक , लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | वसंत देसाई | ||
| स्वर | - | महेंद्र कपूर | ||
| चित्रपट | - | छोटा जवान (१९६३) | ||
|
||||