| सदैव सैनिका,
पुढेच जायचे न मागुती तुवा, कधी फिरायचे सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा सदैव काजळी, दिसायच्या दिशा मधून मेघ हे, नभास ग्रासती मधेच या विजा, भयाण हासती दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे प्रलोभने तुला, न लोभ दाविती न मोहबंधने, पदांस बांधिती विरोध क्रोध वा, तुला न थांबवी न मोह भासतो, गजांत वैभवी न दैन्यही तुझे, कधी सरायचे |
||||
| गीत | - | वसंत बापट | ||
| संगीत | - | वसंत देसाई | ||
| स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद | ||
|
||||