| पाठ शिवा हो,
पाठ शिवा तारुण्यातही बाळपणाचा, खेळ वाटतो हवा हवा बन केळीचे हरित सावळे, लपायास मज असे मोकळे प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा ? नुपुर विरहित जरि तव पाऊल, अचुक मला पण लागे चाहुल कानांनाही फुटते दृष्टी, तुझ्या ऐकता पायरवा उमटु न देइन साद पाउली, सटकन जाइन जशी सावली सामावुन मज घेइल अलगद, हा रंभांचा उभा थवा सावली होशिल, परि कशाची ? तुझ्या रूपाची, तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे ? दोन जिवांचा जडे दुवा |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | वसंत पवार | ||
| स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके | ||
| चित्रपट | - | वरदक्षिणा (१९६२ ) | ||
|
||||