| गंजल्या ओठास
माझ्या धार
वज्राची मिळू
दे ! आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ! पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो; वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे ! सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो; सारखे अस्तित्व माझे पेटताना वर्दळू दे ! लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे ! आणु दे गा वंचकांना क्रूस छ्द्माचा दयाळा; रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे ! |
||||
| गीत | - | सुरेश भट | ||
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर | ||
| स्वर | - | रवींद्र साठे | ||
| चित्रपट | - | उंबरठा (१९८१) | ||
|
||||