| उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे कसे मिटलेले अजूनही अजूनही ! सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही ! लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे ! झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारापाणी चिमुकल्या चिमुकल्या ! बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई उठोनिआ दूर जाई भूर भूर भूर भूर ! |
||||
| गीत | - | कुसुमाग्रज | ||
| संगीत | - | कमलाकर भागवत | ||
| स्वर | - | सुमन कल्याणपूर | ||
|
||||