| गेले द्यायचे
राहून, तुझे
नक्षत्रांचे
देणे; माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त; दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला; होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा |
||||
| गीत | - | आरती प्रभू | ||
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर | ||
| स्वर | - | आशा भोसले | ||
|
||||