आई, बघ ना कसा हा दादा ?
मला चिडवायचं हाच याचा धंदा !

लग्न बाहुलीचं लावता आम्ही
म्हणतो, "नवरदेव आहे मी
आता मलाच मुंडावळी बांधा !"

कधी मोठेमोठे करतो डोळे
कधी उगाच विदुषकी चाळे
भारी खट्याळ, नाहि मुळि साधा

दादा भलताच द्वाड आहे आई
खोड्या करून छ्ळतो बाई
याला ओवाळायची नाही मी यंदा
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - सी. रामचंद्र
स्वर - सुषमा श्रेष्ठ
 
www.aathavanitli-gani.com