| ल ल्ला लला
ललला, ल ल्ला
लला ललला पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे ! मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची ! इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात चिमणा, चिमणी अन् भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ! आभाळ झेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ! पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना हासते नाचते घर सारे, हासती छ्प्पर, भिंती, दारे ! |
||||
| गीत | - | शांता शेळके | ||
| संगीत | - | सी. रामचंद्र | ||
| स्वर | - | राणी वर्मा, प्रमिला दातार, अरुण सरनाईक | ||
| चित्रपट | - | घरकुल (१९७०) | ||
|
||||