| नाही कशी म्हणू
तुला, म्हणते
रे गीत; परी सारे हलक्याने : आड येते रीत. नाही कशी म्हणू तुला ..... येते जरा थांब; परी हिरव्या वळणांनी जायचे न लांब. नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी; परी नीट, ओघळेल, हासतील कोणी. नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव; परी नको अधरांचा मोडू सुमडाव. नाही कशी म्हणू तुला, जर लपूछपू; परी पाया खडेकाटे, लागतात खुपू. नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी; परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी. |
||||
| गीत | - | आरती प्रभू | ||
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
|
||||