| आईसारखे दैवत
साऱ्या जगतावर
नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई मुलांनो शिकणे अ, आ, ई तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा तीन त्रिकाळी देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी कौसल्येविण राम न झाला देवकीपोटी कृष्ण जन्मला शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माउली पुण्याईचे थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | दत्ता डावजेकर | ||
| स्वर | - | सुमन कल्याणपूर | ||
| चित्रपट | - | वैशाख वणवा ( १९६४) | ||
|
||||