| खोडी माझी काढाल
तर अशी मारीन
फाइट, घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट ! अंगावरती याल तर असा देइन ठोसा, कोपऱ्यात जाउन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा ! बजरंग माझा भाऊ भीम माझा काका, सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका ! दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो, अंगामध्ये ताकद आहे मग कोण भीतो, मग कोण भीतो ? |
||||
| गीत | - | शांता शेळके | ||
| संगीत | - | मीना खडीकर | ||
| स्वर | - | योगेश खडीकर | ||
|
||||