| पाऊस आला वारा
आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भर भर गारा वेचू ! गरगर गिरकी घेते झाड धडधड वाजे दार कवाड अंगणातही बघता बघता पाणी लागे साचू ! अंगे झाली ओलीचिंब झुलू लागला दारी लिंब ओली नक्षी पाऊसपक्षी कुणी पाहतो वाचू ! ओसरुनी सर गेली रे उन्हे ढगांतुन आली रे इंद्रधनुष्यामध्ये झळकती हिरे माणके पाचू ! |
||||
| गीत | - | शांता शेळके | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | सुषमा श्रेष्ठ | ||
|
||||