| टप टप टप थेंब
वाजती, गाणे
गातो वारा विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा पाऊस आला रे पाऊस आला घराघरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई आनंदे हंबरते गाई समोर विसरून चारा |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | शमा खळे | ||
|
||||