| मनाच्या धुंदीत
लहरीत ये ना सखे ग साजणी ! ये ना ! जराशी सोडून जनरीत ये ना सखे ग साजणी ! ये ना ! चांदणं रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा अति साजरा माझ्या शिवारि ये तू जरा चारा घालीन तुज पाखरा माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी, ग ये गुलाबी गालांत हासत ये ना सखे ग साजणी ! ये ना ! जराशी लाजत मुरकत ये ना सखे ग साजणी ! ये ना ! आता कुठवर धिर मी धरू ? काळिज करतंय बघ हुरहुरू सजणे नको ग मागे फिरू माझ्या सुरांत सुर ये भरू माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी, ग ये बसंती वाऱ्यात, तोऱ्यात ये ना सखे ग साजणी ! ये ना ! सुखाची उधळीत बरसात ये ना सखे ग साजणी ! ये ना ! |
||||
| गीत | - | शांता शेळके | ||
| संगीत | - | देवदत्त साबळे | ||
| स्वर | - | जयवंत कुलकर्णी | ||
|
||||