| ठाऊक नाही मज
काही ! ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ? मऊ जशी ती साय दुधाची, होती आई का तशी मायेची ? बागेतील ते कमल मनोहर, आई होती का तशीच सुंदर ? देवाघरी का एकटी जाई ? ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ? चिउकाऊची कथा चिमुकली, सांगत होती का ती सगळी ? अम्हांसारखे शुभंकरोती, म्हणे रोज का देवापुढती ? गात असे का ती अंगाई ? ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ? मऊ साइहुन आई प्रेमळ ! गंगेहून ती आहे निर्मळ अमृताचे घास भरविते आभाळापरी माया करीते आईवाचून मीही विरही ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ? |
||||
| गीत | - | मधुसूदन कालेलकर | ||
| संगीत | - | राम कदम | ||
| स्वर | - | स्नेहल भाटकर, वसुमती दोंदे | ||
| चित्रपट | - | एक धागा सुखाचा ( १९६०) | ||
|
||||