आवडती भारी मला माझे आजोबा

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गाती गीता माझे आजोबा

नातवंडा बोलावून
घोगऱ्याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा घेती माझे आजोबा

रागेजता बाबा-आई
अजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा

खोडी करी खोडकर
अजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - ऊन पाऊस (१९५४)
 
www.aathavanitli-gani.com