| गमाडि गंमत
जमाडि जंमत,
ये ग ये सांगते
कानात बोलायचं नाहि पण, सांगायचं नाहि कुणी हसायचं नाहि ग गालात गच्चिवर चल, जिन्याखाली चल, चला ग जाऊ बागेत मागिल दारी, पुढच्या दारी, इथंच सांगते कानात पण बाई शप्पत, गळ्याची शप्पत, नाही कुणाला बोलायचं खरंच सांगते, दिलं वचन ते, नाही कुणी ग मोडयचं काय झालं बाई, किनई ग, बाई इश्श ग बाई, बोलू कसं ? आमची किनई, मनी किनई बाई बाई सांगू कसं ? दोन नी तीन, तीन नी दोन पिटुकलि पिल्लं झाली तिला अशि बाई, गंमत गमडि गंमत, चला गडे ग, बघा चला |
||||
| गीत | - | आशा गवाणकर | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | कुंदा बोकील | ||
|
||||