| टप् टप् पडती
अंगावरती प्राजक्ताची
फुले भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे ! कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पाहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले ! गाणे अमुचे झुळ-झुळ वारा गाणे अमुचे लुक-लुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले ! फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळुनि सूर, चला रे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे ! |
||||
| गीत | - | मंगेश पाडगावकर | ||
| संगीत | - | वसंत देसाई | ||
| स्वर | - | |||
|
||||