| अगा करुणाकरा
करितसे धांवा
। या मज सोडवा लवकरी ॥१॥ ऐकोनियां माझी करुणेची वचने । व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥ मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥ उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥ उरलें तें एक हेंचि मज आतां । अवघें विचारितां शून्य झालें ॥५॥ तुका म्हणे आतां करीं कृपा दान । पाऊलें समान दावीं डोळा ॥६॥ |
||||
| रचना | - | संत तुकाराम | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
| राग | - | तोडी (नादवेध) | ||
|
||||