| कमोदिनी काय
जाणे तो परिमळ
। भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ कैसें तुज ठावें नाही तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥ माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥२॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाही त्याची भेटी भोगती ये ॥३॥ |
||||
| रचना | - | संत तुकाराम | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
|
||||